VOICE OF PUNE – Pravin Gaikwad

    0
    voice-of-pune-pravin-gaikwad

    टेनिस क्रिकेट ची दुनिया प्रत्येकाला एक वेगळा आनंद देऊन जाते.खेळाडू चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी करुन क्रिकेट रसिकांना खुश करत असतात तर काही लोक मैदानाच्या बाहेरुन मैदानात रंग चढ़वत असतात त्यात समालोचक हा घटक असतो असाच एक समालोचक म्हणजे आपल्या पहाड़ी बुलंद आवाजाने क्रिकेट रसिकांची मने जिंकनारा सर्वांचा लाडका प्रविण गायकवाड. 30 जुन हा जन्मदिवस असलेल्या प्रविण ने 2005-2006 साली समालोचन करायला सुरवात केली.

    समालोचनाचा बादशहा सितारामदादा चौधरी यांना गुरु मानुन त्यांच्या बरोबर अनेक ठिकाणी समालोचन केले प्रविण चे ग्रामीण भागातील समालोचन पाहुन पुणे शहर, जुन्नर, संगमनेर, आंबेगाव, शिरूर, खेड, मावळ, मुळशी या ठिकाणाहूनही प्रविण ला मागणी येऊ लागली. टेनिस क्रिकेट बरोबर लेदर क्रिकेट मध्ये देखील प्रविण ने आपल्या समालोचनाचा ठसा उमटवला. चंदु बोरडे सर दिलीप वेँगसरकर सर यांच्या सारख्या दिग्गजांनी प्रविण चे तोंडभरून कौतुक केले. प्रविण तांबे, वासीम जाफर, आविष्कार साळवी त्याच बरोबर केदार जाधव यांनी प्रविण चे समालोचन ऐकून त्याला भविष्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. प्रविण गायकवाड यांची अशीच प्रगती होत रहावी म्हणुन www.tenniscricket.in कडुन त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा

    Photos :