Chandrakant Shinde (Chandra)

0

टेनिस क्रिकेट च्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहावं  अस एक नाव  ते म्हणजे  चंद्रकांत जगन्नाथ शिंदे ( चंद्रा ).  असा एक व्यक्ती ज्याने आपल्या आयुष्यातला एक मोठा काळ टेनिस क्रिकेट विश्वाला अर्पण केला  आणि अजूनही करतोय. चंद्रा हा टेनिस बोल क्रिकेट विश्वातला आजपर्यंतचा सगळ्यात यशस्वी कर्णधार ठरला. एक असा खेळाडू ज्याने टेनिस क्रिकेट ला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आणि एक स्वतंत्र व्यासपीठ दिलं. टेनिस बोल क्रिकेट मधली “वर्ल्ड ११ ” टीम जर काढायची ठरवली तर चंद्रकांत शिंदे (चंद्रा ) हे नाव सगळ्यात आधी लिहायला हवं.

त्यांना  असलेला टेनिस क्रिकेट बद्दलचा आदर आणि त्याचं  टेनिस क्रिकेट वर असलेलं प्रेम पाहून जणू काही  त्यांच्या रक्तातच क्रिकेट सळसळतय. ज्या पद्धतीने ते सातत्य पूर्व टेनिस क्रिकेट खेळत राहिले जणू काही त्यांचा जन्म टेनिस क्रिकेट साठीच  झाला आहे. १९८४ मध्ये चंद्रा ह्यांनी आपल्या व्यावसाईक क्रिकेट ला सुरुवात केली. त्यांनी स्वतः राहुल ११  नावाचा संघ  चालू केला आणि पुढे जाऊन राहुल ११ ने  तब्बल १० वर्ष टेनिस क्रिकेट विश्वावर राज्य केलं, आणि चंद्रा  हे एक यशस्वी कर्णधार म्हणून ओळखले गेले.

चंद्रासाठी क्रिकेट काय आहे हे वेगळं सांगायची गरज नाही, खरतर हि जरा अंदर कि बात आहे पण तेवढच कटू सत्य आहे.
लग्नाच्या दिवशी उरण ला एक मोठी टेनिस क्रिकेट स्पर्धा होती, पण चंद्रा च फक्त शरीर इथे आणि मन मात्र त्या स्पर्धेच्या जय्यत तयारीत लागल होतं.
डोक्यावर अक्षता पडल्यावर रिसेप्शन आटोपलं काही वेळातच कपडे बदलून चंद्रा कीट मध्ये तयार आणि उरण जाऊन ती स्पर्धा जिंकली सुद्धा.
तुम्ही विचार करू शकता क्रिकेट वर एवढं प्रेम करणारा खेळाडू मिळणं कठीणच.

सलाम अश्या  टेनिस क्रिकेट खेळाडूला, संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाकडून……

1
2
SHARE
Previous articleAjith Puthran
Next articleAvinash Jadhav